⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | व्यापाऱ्याला लुटणारा एलसीबीच्या जाळ्यात

व्यापाऱ्याला लुटणारा एलसीबीच्या जाळ्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२१ । धारदार शस्त्र दाखवून व्यापाऱ्याकडून सोने व रोकड लंपास केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीला उमाळा येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अजय सुदाम भिल (वय 22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल गुह्यात व्यापाऱ्याला मारहाण करून सोने व रोकड लुटल्याची घटना घडली होती.  गुन्हा घडल्यापासून संशयित आरोपी हा फरार होता. दरम्यान,आज उमाळा गावातील व जिगर बोडारे याच्या गंगमधील सराईत गुन्हेगार व काही गुन्ह्यात फरार आरोपी वेष बदलून गावात आला असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकले यांना मिळाली. त्यावेळेस त्यांनी पोलीस अंमलदार पोहेकॉ प्रदीप पाटील, जयंत चौधरी, विजय पाटील पंकज शिंदे यांनी आज सकाळी गावात पाठवून  सापळा रचून संशयित आरोपी अजय भिल याला अटक केली आहे. 

यावेळी संशयित आरोपीस विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली व जिगर बोंडारे या सराईत गुन्हेगार यांच्यामधील सदस्य असल्याचे देखील त्याने कबुली दिली आहे. सदर आरोपीस अटक करून त्याची वैद्यकीय चाचणी करून पुढील कार्यवाहीसाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी हा उमाळा गावात आलेत आल्याची गोपनिय माहिती आज मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी पथक तयार करून संशयित आरोपीला अटक करणे कामी रवाना केले. पोहेकॉ प्रदीप पाटील, जयंत चौधरी, विजय पाटील पंकज शिंदे यांनी आज सकाळी गावात जाऊन सापडत असून संशयित आरोपी अजय भिल याला अटक केली आहे. दरम्यान  पुढील कारवाईसाठी यामुळे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.