जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ । पोलिसांच्या रेकॉर्डवर फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या दिपक निळकंठ जावळे (सुप्रिम कॉलनी, जळगाव) यास एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके सध्या फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनला विविध कलमानुसार आर्थिक स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेला दीपक निळकंठ जावळे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.
एलसीबीचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेंढे, प्रदिप पाटील, महेश महाजन, संतोष मायकल यांनी जावळे याला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.