जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२२ । खाऊ देण्याच्या बहाण्याने ५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित नराधमास नैसर्गिक मृत्युपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व एकत्रीत रक्कम रुपये ५,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. संदीप सुदाम तिरमली (वय ३६ वर्षे, रा. शिरसगांव, ता. चाळीसगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
काय आहे घटना?
याबाबत सविस्तर असे की, दिनांक ०३/०१/२०२१ रोजी रात्री ७.३० ते ८.०० वाजेच्या दरम्यान पिडीता ही तिच्या मैत्रिणीसोबत अंगणात खेळत असतांना आरोपी संदीप सुदाम तिरमली याने पिडीत मुलीला खाउ देण्याचे आमिष दाखवून तिला राहत असलेल्या घरी बोलावले. यावेळी नराधमाने तिला खाउ घेण्यासाठी १० रुपयाच्या ३ नोटा देऊन तिच्यावर बळजबरीने शारिरीक अत्यावर केला.
त्यानंतर पिडीत मुलगी ही रडत रडत घरी आली. ती आली तेव्हा तिच्या हाताच्या मुठीत १० रुपयाच्या ३ नोटांना रक्ताचे डाग होते. यावेळी पीडितेने सर्व हकीकत सांगितल्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांनी मेहुणबारे पो.स्टे. येथे आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला. त्या अनुषंगाने पोलीसांनी गु.र. क.. २ / २०२१ भा.द.वि. कलम ३७६ (२) (आय), ३७७ आणि बा.लै.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, १२ नुसार तकार नोंदविली.
सदर खटल्याची सुनावणी ही अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांच्या न्यायालयासमोर झाली. त्यात शासकिय अभियोक्ता केतन ढाके यांनी एकूण ६ साक्षीदार तपासले. यात फिर्यादी, पिडीतेचे वडील, पंच साक्षीदारांची साक्ष तपासी अंमलदार व डॉक्टर यांची साक्षी खुप महत्वपूर्ण ठरल्या. तसेच सदर कामातील तपासी अधिकारी हेमंत शिंदे यांनी योग्य प्रकारे काम केल्यामुळे तसेच सरकारपक्षातर्फे करण्यात आलेला प्रभावी युक्तीवाद मे. न्यायालयाने ग्राहय धरत आरोपीस भा.दं.वि. कलम ३७६ (२) (जे), ३७६ऐबी आणि वा.लै. अ.प्र.अधिनियम २०१२ चे कलम ३ व ५ अन्वये ठोठावली: दोषी धरून आरोपीस नैसर्गिक मृत्युपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.