जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२१ । भुसावळ शहरातील पंचशील नगरातील तरुणांचा लॉकडाउन दरम्यान झालेल्या मारहाणीत डोक्यात लोखंडी रॉड लागल्याने जखमी तरुणास डॉ.मानवतकर यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान त्या तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी पंचशील नगरातील एका तरुणाने डॉक्टरांच्या दवाखान्याचे नुकसान केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील फरार आरोपीस दिनांक १८ मार्च रोजी जेरबंद करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की,फिर्यादी डॉ.राजेश मानवतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला दवाखान्याची तोडफोड करून नुकसान करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्या गुन्ह्यातील फरार आरोपी समीर शेख जाकीर शेख वय 31वर्षे राहणार पंचशील नगर भुसावळ हा’ त्या ‘ रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने दवाखान्यातील काच व काउंटर तोडफोड करून फरार झाला होता . त्याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला गु रं न 896/2020 महाराष्ट्र राज्य पोलीस वैद्यकीय सेवा बाबत घडणाऱ्या हिसंक कृत्यांना प्रतिबंधक तसेच अधिनियम 2010 चे कलम 4 प्रमाणे भादवी कलम 427,504 प्रमाणे गुन्ह्या दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील आरोपीस गुरुवार दिनांक १८ मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे,सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,सपोनि मंगेश गोंटला, अनिल मोरे,गणेश धुमाळ,पोकॉ.गजानन वाघ, सुभाष साबळे,रवी तायडे,योगेश महाजन अशांनी केलीआहे .