जळगाव लाईव्ह न्यूज । १८ फेब्रुवारी २०२२ । आईला भेटून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वराला अज्ञात पिकअप व्हॅनने धडक दिल्याने अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना धुळे रस्त्यावरील कलागुरु मंगल कार्यालयाजवळ दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमळनेर पोलिसांत अज्ञात वाहन-चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर जखमीवर धुळे येथे उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
मालेगाव येथील संगमेश्वर परिसरातील माळी नगरमधील कार्तिक प्रवीण महाजन (वय २१) हा त्याचा मित्र गौरव वाघ याला सोबत घेऊन आईला पाहण्यासाठी रुग्णालयात आला होता. आईला पाहिल्यानंतर होंडा स्प्लेंडर (एमएच- ४१, एपी- ६३०१)या दुचाकीने ते अमळनेरहून मालेगाव कडे परत जात हाेते. दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास धुळे रस्त्यावरील कलागुरु मंगल कार्यालयाजवळ धुळ्याकडे जाणाऱ्या अज्ञात मालवाहू पिकअप व्हॅनने त्यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून कार्तिक खाली पडला. त्याचवेळी पिकअप व्हॅनचे चाक डोक्यावरून गेल्याने कार्तिकचा जागीच मृत्यू झाला. तर गौरव वाघ हा बाजुला फेकला गेला. गाैरवच्या चेहऱ्यावर, छातीवर, पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळावरून चारचाकी चालक पसार झाला आहे. या प्रकरणी नंदकुमार महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
शांत, संयमी व हुशार होता कार्तिक महाजन
खाली पडला. त्याचवेळी पिकअप व्हॅनचे चाक डोक्यावरून गेल्याने कार्तिकचा जागीच मृत्यू झाला. तर गौरव वाघ हा बाजुला फेकला गेला. गाैरवच्या चेहऱ्यावर, छातीवर, पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथे दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळावरून चारचाकी चालक पसार झाला आहे. या प्रकरणी नंदकुमार महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
अपघातातील मृत कार्तिक महाजनचे अमळनेर आजोळ आहे. तर आई दीपा महाजन यांची स्वतःचे भाऊ असलेल्या डॉ. दिनेश महाजन यांच्या मोरया रुग्णालयात जवळपास ८ दिवसांपूर्वी गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ‘त्या’ ढेकू रोडवरील त्यांच्या माहेरी आराम करण्यासाठी थांबलेल्या होत्या. त्यांना भेटण्यासाठी मृत कार्तिक व त्याचा मित्र गौरव वाघ हे अमळनेरला आले होते. मात्र, घरी मालेगाव येथे परत जाताना अमळनेर मध्येच त्यांच्यावर काळाने घाला घातला. मृत कार्तिक हा शांत, संयमी व हुशार होता. अपघाताचे वृत्त कळताच त्याचे सर्व मित्र ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. त्याच्या पश्चात आई-वडील, १ भाऊ, १ बहिण असा परिवार आहे.