जळगाव लाईव्ह न्यूज । जामनेर-पहूर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ एक भीषण अपघात झालाय. ज्यात रामपूर तांडा लहासर (ता. जामनेर) येथून विवाह सोहळा आटोपून परतणाऱ्या क्रूझरला आयशर कंटेनरने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. यात या भीषण दुर्घटनेत नवरदेवाचे काकाजागीच ठार झाले. दशरथ रतन चव्हाण असं मयत व्यक्तीचे नाव असून या घटनेत अन्य नऊ वऱ्हाडी जखमी झाले आहेत.

या घटनेबाबत असे की, जामनेर तालुक्यातील रामपूर तांडा लहासर येथे लग्न असल्याने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फर्दापूर येथील रहिवाशी असलेले लग्नाचे वऱ्हाड हे शनिवारी १० मे रोजी लग्नासाठी आलेले होते. लग्न आटोपल्यानंतर लग्नातील वऱ्हाड मंडळी क्रुझर वाहनाने फर्दापूर गावाकडे जाण्यासाठी जामनेर रोडने निघाले. मात्र जामनेर-पहूर मार्गावर सोनाळा फाट्याजवळ आयशर कंटेनरने क्रूझरला धडक दिली
या वाहनात बसलेले नवरदेवाचे काका दशरथ चव्हाण यांचा जागेवरच मृत्यू झाला.तर सोबत असलेले लखिचद शंकर चव्हाण (वय ५०), मोहनदास शंकर जाधव (वय ५०), विक्रम मोतीलाल चव्हाण (वय २५), बाबू पांचु जाधव (वय ७५), उखा दलू राठोड (वय ६५), धिरलाल सदू राठोड (वय ६५), हिरा महारु चव्हाण (वय ५८), प्रतीक प्रवीण राठोड (वय ७), भिवसिग मनुर चव्हाण (वय ७५) सर्व रा. फर्दापूर ता.सोयगाव जि. छत्रपती संभाजी नगर हे जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांसह वहऱ्हाडातीलच अन्य वाहनांमधील नातेवाइकांनी जखमींना पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनरसह चालकास ताब्यात घेतलं. या प्रकरणी पहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.