⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | संभाजीनगर-जळगाव मार्गावर आपघात : कार थेट नदीच्या पात्रात कोसळली

संभाजीनगर-जळगाव मार्गावर आपघात : कार थेट नदीच्या पात्रात कोसळली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२२ । राज्यात सुरु असलेले अपघाताचे सत्र थांबता थांबत नाहीये. या घटना वाढतच चालल्या आहेत. अशातच छत्रपती संभाजीनगर-जळगाव मार्गावर मोठा अपघात झाला आहे. माणिकनगर येथील पूर्णा नदीच्या पुलावरून कार नदीत पडल्याने तिघे जण जखमी झाले असुन दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

सिल्लोडहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी एक कार माणिकनगर येथील पूर्णा नदीवरील पुलाच्या तुटलेल्या कठड्यातून नदीच्या पात्रात कोसळली. उंची ३० ते ३५ फूट इतकी आहे.

शिवाजी नामदेव पांडे (४५), संदीप जनार्दन पिसाळ (३०) आणि मयूर सुनिल राऊत (२३) अशी जखमींची नावे आहेत. सर्व सिल्लोड तालुक्यातील राहणारे आहेत . या जखमींना नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह