जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२१ । पाळधी गावाजवळ महामार्गावर शिरपूरकडून जळगावच्या दिशेने जात असलेल्या चारचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने चार चाकी रस्त्याच्या कडेला उलटली. दैव बलवत्तर असल्याने अपघातात चौघे बचावले असून कोणालाही गंभीर इजा झालेली नाही.
चारचाकी क्रमांक एमएच.१८.एजे.९६३५ मध्ये पती, पत्नी व दोन मुले असे शिरपूरकडून जळगावच्या दिशेने येत होते. पाळधी गावाजवळ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास चारचाकी चालकाचे अचानक वाहनावरून नियंत्रण सुटल्याने चार चाकी रस्त्याच्या कडेला उलटली. सुदैवाने अपघातात कुणालाही गंभीर इजा झाली नसून चौघे प्रचंड घाबरले होते. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत जखमींची मदत करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.