जळगाव जिल्हा

खड्डे चुकविण्याच्या नादात बस वरील ताबा सुटला अन्… थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ डिसेंबर २०२३ । राज्यात महामंडळाच्या एसटी बसला होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यातच अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाली असून मोठ मोठ्या खाड्यांमुळे देखील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशातच चोपडा येथून नाशिकला निघालेली एसटी बस खड्डा चुकविण्याच्या नादात बस थेट सुत गिरणीत जाऊन शिरली अन् पाण्याच्या कुंड्याला धडकली. चालकाने वेळीच प्रसंगावधान राखत बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नसून या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे

याबाबत असे की, चोपड्याहून नाशिकला निघालेली एमएच-१४ बीटी २१४२ क्रमांकाची बस चालक विनोद भास्कर कोळी हे नेहमी प्रमाणे घेऊन निघाले. परंतू तापी सूतगिरणी जवळ रस्त्याला मोठा खड्डा असल्याकारणाने चालकाच्या बसवरील ताबा सुटला. यामुळे ती सरळ सुत गिरणीत जाऊन एका झाडाला धडक देताच तेथील फाउंटनच्या पाण्याचा कुंड्याला धडकली. सुदैवाने या अपघातात एकही प्रवासी जखमी झाला नाही.

यावेळी तात्काळ घटनास्थळी बस स्थानकातले प्रमुख चंद्रभान रायसिंग, प्रभाकर महाजन ,अशोक पाटील, यांच्यासह काही लोकांनी भेटी दिल्या. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन मोठं मोठे खड्डे तरी बुजावावेत अशी मागणी होत आहे. यावेळी वाहक सचिन गुलाबराव कदम हे देखील सोबत होते. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला चालक विनोद भास्कर कोळी हे स्वतः फिर्याद देण्यासाठी गेले असल्याचे कळते.

godavari advt

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button