Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत कार कोसळली दगडी खदाणीत, तरुण जागीच ठार

मे 23, 2022 11:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२२ । पारोळा येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश महाजन यांचे सुपूत्र भटेश महाजन यांच्या इंडिका कारला, २१ रोजी रात्री २ वाजता अज्ञात वाहनाने धडक दिली. चोरवड रस्त्यावरील आईस फॅक्टरीजवळ हा अपघात झाला. अपघातात कार रस्त्याच्या खाली दगडी खदाणीत जाऊन पडली. त्यामुळे भटेश महाजन यांचा जागीच मृत्यू झाला.

accident 16 jpg webp

२१ रोजी रात्री २ वाजता भटेश महाजन हे आपली हॉटेल बंद करून कारने (क्र.एम.एच.१९-बी.यु.३८०८) न्यू बालाजीनगर, चोरवड रोड येथील आपल्या घराकडे येत होते. वाटेत चोरवड रस्त्यावर हॉटेल साहेबाच्या पुढे असलेल्या आईस फॅक्टरीजवळ त्यांच्या वाहनास, दुसऱ्या अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे महाजन यांची कार रस्त्यालगत असलेल्या खदानीत जाऊन कोसळली.

Advertisements

रात्री उशिरापर्यंत भटेश घरी न आल्याने रात्री अडीच वाजता वडील रमेश महाजन यांनी शोध घेतल्यानंतर रात्री साडेतीन वाजता त्यांची कार खदानीत पडलेली आढळली. भटेश महाजन यांना जखमी अवस्थेत रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर व यश ठाकूर यांनी कुटीर रुग्णालयात आणले, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now