जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील बोरावल बुद्रुक येथून ॲपेरिक्षाद्वारे यावलकडे येणाऱ्या चालकाचा अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. विनोद विकास सपकाळे (वय ३५) रा. बोरावल बुद्रुक असे मृताचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, विनोद सपकाळे हा प्रवासी वाहतुकीसाठी ॲपेरिक्षा घेऊन यावल शहरात येत हाेता. बोरावल बुद्रुक गावाबाहेर अर्धा किमी अंतरावर ॲपेरिक्षाला अपघात हाेऊन ती रस्त्याच्या कडेला कलंडली. या अपघातात चालक विनाेद सपकाळे जागीच ठार झाला. अपघाताची माहिती पोलिस पाटील किरण पाटील यांनी येथील पोलिसांना दिली. सपाेनि अजमल खान पठाण हे पथकासह अपघातस्थळी पाेहाेचले. त्यांनी विनोद सपकाळेचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला. डॉ.शुभम तिडके यांनी शवविच्छेदन केले.पोलिसांकडून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात अाला.