धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवून पळविले अन् तीन दिवस केले अत्याचार!

ऑगस्ट 24, 2022 2:29 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२२ । चोपडा शहरात राहणाऱ्या बहिणीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देवून पळवून नेले. त्यानंतर मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी ३ वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक बातमी प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून संशयित तरुण सचिन ऊर्फ टिंग्लया मेवा रा.कालीकुंडी ता. वरला जि. बडवाणी (मध्य प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

rape jpg webp

नेमकी काय आहे घटना?
चोपडा शहरात राहणाऱ्या बहिणीकडे मध्यप्रदेशातून अल्पवयीन मुलगी राहायला आली होती. परंतु येथे दोघाबहिणीमध्ये भांडण झाल्याने पीडित मुलीने आरोपी सचिन ऊर्फ टिंग्लया मेवा यास फोन करुन तिला घेवुन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे दिनांक २९ जुलै २०२२ रोजी पिडिता चोपडा शहर बस स्थानकावर आल्यानंतर, संशयित आरोपी सचिन याने सदर ठिकाणी येवुन पीडित तरुणीस तुझ्यासोबत लग्न करायचे असल्याचे सांगुन तिला बसने लकडीया (महाराष्ट्र) येथे नातेवाईकांकडे घेवुन गेला.

Advertisements

दरम्यान याठिकाणी एक दिवस राहील्यानंतर हरीयाणा येथील संशयित आरोपी सचिन याचा मित्र राहुल यांच्या घरी ४ दिवस राहीले. त्या ठिकाणी संशयित आरोपी याने पीडित तरुणीच्या संमतीशिवाय ३ वेळा शारीरीक संबंध केले. त्यानंतर तेथुन सेंधवा (मध्य प्रदेश) येथे आरोपीच्या नातेवाईकाच्या घरी येवुन तेथे देखील संशयित आरोपी याने शारीरीक संबंध केले.

Advertisements

यानंतर वरला येथे मुळगावी आल्यानंतर पीडित तरुणीने वरला पोलीस स्टेशन जि. बडवानी मध्य प्रदेश येथे दिनांक ६ ऑगस्ट २०२२ रोजी तक्रार दिली असुन, वरला पोलीस स्टेशन येथे ०० / २०२२ प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाची कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयामार्फतीने आज रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली आहेत. याप्रकरणी पुढील तपास पो.नि संतोष चव्हाण हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now