जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । शहरापासून जवळच असलेल्या एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देत एकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गावातील संशयित आरोपी साबीर शेख जहूर (वय-२६) याची अल्पवयीन मुलीशी ओळख होती. ओळखीचा आणि समाजात असलेल्या स्थानाचा फायदा घेत त्याने दि. १ ऑगस्ट २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान अल्पवयीन मुलीला घरी बोलाविले. संशयित साबीर शेख याने मुलीला त्याच्या घरी बोलावून पाण्यात गुंगीचे औषध देवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने आपल्या नातेवाईकांसह एमआयडीसी पोलीसात धाव घेतली.
अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी संशयित आरोपी साबीर शेख जहूर याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे. दरम्यान, संशयिताची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून शनिवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
हे देखील वाचा :
- एकनाथ खडसे करणार घरवापसी? मंत्री बावनकुळेंच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचवल्या
- जळगावात चुकीच्या दिशेने धावणाऱ्या डंपरने दुचाकीला उडविले ; एक तरुण ठार, दोघे गंभीर जखमी
- जमिनीच्या अभिलेख दुरुस्ती प्रक्रियेत पारदर्शकता अनिवार्य; १५ ते २७ मे दरम्यान विशेष तपासणी मोहीम
- जळगावात चाललंय काय? तरुणांच्या टोळक्याकडून घरांवर सशस्त्र हल्ला, वाहनांचीही तोडफोड
- समुपदेशनातून तणाव व आजारावर मात करीत गोदावरी स्कूलच्या कनिष्काचे निकालात यश