यावल नगरपालिकेच्या प्रभारी नगरध्यक्षपदी अभिमन्यू चौधरी
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल नगरपालिकेवर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रभारी नगराध्यक्षपदी अभिमन्यू चौधरी यांची निवड करण्यात आली.गराध्यक्षा नौशाद तडवी यांनी आपला पदभार काही काळासाठी चौधरी यांच्याकडे सोपविला असून,१५ रोजी चौधरी यांनी पदाचा पदभार स्वीकारला आहे.
दरम्यान,नगरपालिकेच्या नगरध्यक्ष नौशाद तडवी म्हणाल्या की,प्रहार जनशक्तीचे नेते अनिल चौधरी यांच्या शब्दाला मन राखून आम्ही आमचे सहकारी तथा विद्यमान उपनगरध्यक्ष पदभार अभिमन्यू चौधरी यांना प्रभारी नगरध्यक्ष पदासाठी सूत्रे सोपविली आहे.तर नगरध्यक्ष म्हणाले,राज्यमंत्री बच्चू कडू,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या आशीर्वादामुळे आज मी नगरध्यक्ष झालो.जेवढे दिवस नगराध्यक्ष पदावर राहील तिथपर्यंत अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रखडलेल्या विकासकामांना मार्गी लावणार. या दरम्यान नवनिवार्चीत प्रहार पक्षाचे प्रभारी नगराध्यक्ष अभिमन्यु चौधरी यांचे अनिल चौधरी यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. दरम्यान, सर्व प्रहार परिवारासाठी हि आनंदाची बातमी असल्याचे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त कले आहे.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी यावल नगराध्यक्षा नौशाद तडवी,समाजसेवक दिलीप वाणी,माजी नगराध्यक्ष तथा प्रहार जनशक्तीचे यावल शहराध्यक्ष तुकाराम बारी, आदीवासी समाजातील समाजसेवक मुबारक तडवी,अल्पसंख्याक तालूकाध्यक्ष मोहम्मद हकीम,कैलास चौधरी,मनोज करणकाळ,प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक शहराध्यक्ष राहुल कचरे,राजू शेख, सागर चौधरी,आयुष वाणी,खन्ना माळी,आसिफ खान व सर्व प्रहारचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.