---Advertisement---
नोकरी संधी

एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी ! 309 जागांसाठी भरती, 140000 पर्यंत पगार मिळेल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये मोठी पदभरती निघाली आहे. ३०९ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार AAI च्या aai.aero या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया २५ एप्रिलपासून सुरू होत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२५ पर्यंत असणार आहे.

AAI Bharti

रिक्त पदाचे नाव : ज्युनियर एक्झिक्युटिव (Air Traffic Control-ATC)
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
अर्जदाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून बी.एससी (भौतिकशास्त्र आणि गणितासह) किंवा बी.ई./बी.टेक पदवी असणे आवश्यक आहे. त्यानंतरच ते या पदांसाठी अर्ज करू शकतात.

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या प्रत्येकाची कमाल वयोमर्यादा २७ वर्षे असावी. भारत सरकारच्या नियमांनुसार राखीव श्रेणींना वयातही सूट दिली जाईल.
किती शुल्क भरावे लागेल?
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क- रु.१,००० (जीएसटीसह)
एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला/एएआय अप्रेंटिस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – शून्य
पगार : Rs.40000/- ते 140000/-

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

अशी होईल निवड?
ऑनलाइन लेखी परीक्षा
कागदपत्र पडताळणी
आवाज चाचणी
वैद्यकीय तपासणी (लागू असल्यास)

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment