गुन्हेजळगाव शहर

जळगावात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । शहरातील नवीपेठ भागात शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेच्या पथकांना एक संशयित तरुण गावठी पिस्तूलसह मिळून आला. दरम्यान, त्याला अटक करण्यात आली असून या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखील सुरेश पाटील (वय 35, रा. खोटे नगर (सुरक्षानगर), जळगांव असे अटकेतील संशयित आरोपीचे आहे. जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना गुप्त माहिती मिळाली, त्यानुसार त्यांनी पो.उप निरी. दत्तात्रय ज्ञानदेव पोटे, पो.हे.कॉ. 3195 भास्कर यशवंत ठाकरे, पो. ना. 1815 प्रफुल्ल दिपक धांडे, पो. कॉ. / 3245 अमोल ठाकुर, पो.कॉ./275 रतन हरी गिते, पो. कॉ. 1402 ज्ञानेश्वर उन्हाळे यांना सदर ठिकाणी रवाना केले असता शहरातील नवीपेठ भागात बँक स्ट्रीट परिसरातील सेंट्रल बँक ऑफ इंडीया चे समोर रोडवर संशयित निखील सुरेश पाटील, वय 35, रा. खोटे नगर (सुरक्षानगर), जळगांव हा एक गावठी पिस्टल (कट्टा ) त्यात 1 राऊंड 9 MM (काडतुस ) मिळून आला तसेच त्याचे कमरेत पँट मध्ये एक कुकरी मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी शहर पो.स्टे. ला गु.र.नं. 318 / 2022 भारतीय शस्त्रअधिनियम कलम 3/25, 4/25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. 3195 भास्कर यशवंत ठाकरे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button