---Advertisement---
जळगाव जिल्हा भुसावळ विशेष

आंतरराष्ट्रीय पातळीवर खान्देशचा डंका; युकेतील निवडणुकीच्या रिंगणात भुसावळचा तरुण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | ३ मे २०२३ | खान्देशातील अनेक तरुण-तरुणी परदेशात नोकरी किंवा व्यवसायानिमित्ताने स्थायिक झाले आहेत. त्यापैकी काही जण उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यात आता नव्या नावाची भर पडली आहे. ते नाव आहे, निनाद ओक! भुसावळातील मूळ रहिवासी तथा युकेमधील मँचेस्टर येथे नोकरी निमित्ताने स्थायिक झालेले निनाद विवेक ओक तेथील सीटी कौन्सिलची निवडणूक लढवत आहे. त्यांना लिबरल डेमॉक्रेटसने उमेदवारी दिली आहे. यूकेच्या पंतप्रधानपदी भारतवंशीय ऋषी सुनक कार्यरत असतांना आता एक मोठ्या निवडणुकीत भारतवंशीय तरुण रिंगणात असल्याने या निवडणुकीकडे भारताचेही लक्ष लागले आहे.

ninad oak jpg webp webp

पुण्यातून अभियांत्रिकी भुसावळातील निनाद ओक याने पुणे येथून अभियांत्रिकी (माहिती आणि तंत्रज्ञान) पदवी घेतली. यानंतर तेथूनच कॅम्पस सिलेक्शन झाले. सध्या निनाद ओक हे आठ वर्षांपासून यूकेत एका भारतीय कंपनीत कार्यरत आहेत. या दरम्यान निनाद तेथील स्थानिक राजकारणाशी सोबत देखील जोडला गेला. लिबरल डमोक्रॅट्स या प्रमुख पक्षाच्या मँचेस्टरमधील बड्या नेत्यांमध्ये निनादचे नाव घेतले जाते. आता पक्षाने निनादला कौन्सिलर पदाच्या निवडणुकीचे तिकीट दिले आहे. ही निवडणूक म्हणजे आपल्या कडची आमदारची निवडणूक, असे म्हटले तरी चालेल.

---Advertisement---

लिबरल डेमोक्रॅट्स या पक्षाच्या प्रचार सभांमध्ये निनाद ओक यांचा सक्रीय सहभाग असतो. यासोबतच प्रचाराची रणनिती आखण्याची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली आहे. यामुळे पक्षाने आता निनादला उमेदवारी दिली आहे. निनाद हे भुसावळचे विवेक ओक व जयश्री ओक यांचे सुपुत्र आहेत. खान्देशच्या तरुणाला इतक्या मोठ्या निवडणुकीत संधी दिल्याने खान्देशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता या निवडणुकीकडे युकेसह खान्देशसह संपूर्ण भारताचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---