जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२२ । शहरातील गोलाणी मार्केटमध्ये रात्री २ वाजेच्या सुमारास वरील माळ्यावरून पडल्याने एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
शहरातील नाथवाडा परिसरात राहणारा मुकेश रमेश राजपूत हा तरुण सोमवारी रात्री २ वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटमध्ये वरील माळ्यावरून पडला. डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मुकेशचा भाऊ उमेश राजपूत याने पोलिसांना याबाबत माहिती दिली.
शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी धनराज निकुंभ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मुकेशला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. सीएमओ डॉ.अजय सोनवणे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.