जय खान्देश : बँक ऑफ अमेरिकेच्या सिनियर मॅनेजरपदी चाळीसगावचा तरुण

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ फेब्रुवारी २०२३ | जळगाव जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणी परदेशात मोठंमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. यात कॉम्यूटर, आयटी क्षेत्रातील तरुणाची संख्या जास्त आहे. हे सर्वजण आंतरराष्ट्रीय पातळीवर खान्देशचे नाव उंचवत आहेत. यात आता भर टाकली आहे. चाळीसगावच्या एका तरुणाने. विनोद पाटील हे त्या तरुणाचे नाव असून विनोदची अमेरिकेच्या सर्वात मोठ्या बँकापैकी एक मानल्या जाणार्‍या बँक ऑफ अमेरिकेच्या सिनियर मॅनेजरपदी नियुक्ती झाली आहे. यामुळे केवळ जळगाव जिल्ह्याच्याच नव्हे तर संपूर्ण खान्देशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

चाळीसगावचे सुपुत्र असणार्‍या विनोद पाटील यांनी पुणे विद्यापीठातून बीई कॉम्प्युटर ही पदवी मिळविल्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील विद्यापीठात निवड झाली होती. अमेरिकेत एसएस ही पदवी मिळाल्यानंतर त्यांची बँक ऑफ अमेरिका येथे निवड झाली होती. आपल्या कतृत्वाच्या जोरावर त्यांनी सर्वप्रथम मॅनेजर व आता सिनियर मॅनेजरपदापर्यंत मजल मारली आहे. अमेरिकेत महाराष्ट्र मंडळात राबविल्या जाणार्‍या उपक्रमांमध्ये विनोद पाटील यांचा सक्रिय सहभाग असतो. यामुळे अमेरिकेत राहणार्‍या मराठी माणसांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. विनोद पाटील हे
चाळीसगावचे माजी नगरसेवक विजयसिंग पाटील यांचे सुपूत्र आहेत.

बँक ऑफ अमेरिकेचा संपूर्ण जगात डंका
बँक ऑफ अमेरिका ही बँकिंग, गुंतवणूक, मालमत्ता व्यवस्थापन आणि इतर आर्थिक प्रकारच्या सेवा देणारी जगातील आघाडीच्या वित्तीय संस्थांपैकी एक आहे. बँक ऑफ अमेरिकाचे सुमारे ३,९०० शाखा, १६ हजार एटीएम आणि अंदाजे ५६ मिलियन खातेधारक आहेत. बँक ऑफ अमेरिका जगभरातील कॉर्पोरेशन, सरकार, संस्था आणि व्यक्तींना सेवा देणार्‍या मालमत्ता वर्गांच्या विस्तृत श्रेणीमध्ये व्यापार करणारी जागतिक अग्रणी बँक मानली जाते. बँक ऑफ अमेरिका कॉर्पोरेशन स्टॉक, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहे.