---Advertisement---
गुन्हे चोपडा

Chopda : नाचता-नाचता तरुण चक्कर येऊन खाली कोसळला अन्.. अवघ्या क्षणात व्हत्याचं नव्हतं झालं

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मे २०२३ । चोपडा शहरातील रामपुरा, पारधीवाडा येथे एक हृदयद्रावक घटना घडलीय. २४ वर्षीय तरुण देवाच्या नवसाचा कार्यक्रमात नाचत असताना भोवळ येऊन खाली पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. संदीप निळकंठ चव्हाण (वय २४) असं मयत तरुणाचं नाव आहे.

chopda jpg webp webp

नेमकी काय आहे घटना?
चोपडा शहरातील रामपुरा (पारधीवाडा) येथे संदीप चव्हाण हा आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. गुरुवारी संदीप चव्हाण याच्या काकांकडे गावातच देवाच्या नवसाचा कार्यक्रम होता. या ठिकाणी रात्रभर धार्मिक गाण्यांचा कार्यक्रम सुरू होता. याच कार्यक्रमात धार्मिक गाण्यांवर संदीप नाचत होता. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास नाचता नाचता संदीपला अचानक चक्कर आले आणि तो जमिनीवर पडला.

---Advertisement---

त्याला तात्काळ कुटुंबियांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वी फार उशीर झाला होता. चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. प्रसाद पाटील यांनी संदीप यास मृत घोषित केले. ज्या घरात आनंदाचे वातावरण होते, त्याठिकाणी अवघ्या क्षणात शोककळा पसरली. मयत संदीप याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.


मृत्यूच्या काही तासांपूर्वी संदीपने चुलत भावाच्या लग्नाच्या वाढदिवस साजरा केला होता. या कार्यक्रमानंतर पहाटेच्या सुमारास संदीप नाचत असताना काळाने झडप घातली आणि त्याचा मृत्यू झाला. ज्या घरात आनंदाचे वातावरण होते, त्याठिकाणी अवघ्या क्षणात शोककळा पसरली. संदीपच्या अचानक जाण्याने मित्रपरिवारासह नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत संदीपचे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---