---Advertisement---
गुन्हे जळगाव शहर

सासरच्या जांचाला कंटाळून विवाहित महिलेने घेतला गळफास

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२३ । सासरच्या जांचाला कंटाळून विवाहित महिलेने टोकाचं पाऊल उचललं आहे. महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ही घटना जळगाव शहरातील उस्मानियॉ पार्कमध्ये आज बुधवारी सकाळी उघडकीस आलीय. सना तौसीफ मिस्तरी (वय-२१) असे मृत विवाहितेचे नाव असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

women succied jalgaon jpg webp webp

सना तौसिफ मिस्तरी ही महिला आपल्या पती, सासू आणि सासरे यांच्यासह वास्तव्याला होते. गेल्या दोन महिन्यांपासून घरात कौटुंबिक वाद सुरू होतो. घरात होत असलेल्या कौटुंबिक वादासंदर्भात विवाहितेने तिचे वडील मजीद शेख सांडू यांना सांगितलेले होतते. गेल्या चार दिवसांपुर्वीच सनाने आपल्या आईवडीलांशी शेवटचे बोलणे झाले होते. मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सर्वजण झोपलेले असतांना विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

---Advertisement---

ही घटना बुधवारी १ मार्च रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आली. दरम्यान, पतीसह सासरच्या मंडळींच्या त्रासातून मुलीने आत्महत्या केली असा आरोप विवाहितेचे वडील मजीद शेख सांडू व आई शबाना मजीद शेख सांडू यांनी केला आहे. सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी मुलीकडील नातेवाईकांनी केले आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात माहेरकडील नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---