रेल्वे स्थानकाजवळ आढळला आनोखी मृतदेह
जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२२ । पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एकाच दिवसातील दुसरी घटना असून पाचोरा ते परधाडे दरम्याने धावत्या रेल्वेतून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर ही दुसरी घटना आहे. याबाबत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अनोळखी इसमाची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, पाचोरा रेल्वे स्थानकानजीक चाळीसगावच्या दिशेला रेल्वे खंबा किलोमीटर ३६८/१८-२० दरम्यान एका २५ ते ३० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना १२ नोव्हेंबर रोजी घडली आहे. घटनेची माहिती पाचोरा पोलिस स्टेशनला कळताच पोलिस कर्मचारी व रुग्णवाहिका चालक अमोल पाटील हे घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा करून अनोळखी मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अनोळखी इसमाची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा तपास तसेच अनोळखी मयताची ओळख पटविण्याचे काम पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ नरेंद्र शिंदे हे करीत आहे.