जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । चोरट्यांचा आळा घालण्यासाठी किती ही प्रयत्न केला तरी ते घाबरणार नाहीयेत, हे एकदा स्पष्ट झालंय. तब्बल विविध ठिकाणी हुन तीन दुचाकीसह एक ऑटो रिक्षा लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत वेगवेगळ्या पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र पाटील (वय ४४ रा. सुभाष नगर भुसावळ) यांच्या मालकीची २० हजार रु. किमतीची, दुचाकी क्रमांक (एमएच १९ एम ५१९६) दि. १४ रोजी शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस, इंजिन घाटावर सार्वजनिक ठिकाणी हुन अनोळखी भामट्याने चोरून नेली. याबाबत पाटील यांनी येथील पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास संजय वासुदेव करीत आहे.
सलीम पटेल ( वय ५९ रा. रावेर) यांच्या मालकीची बजाज कंपनीची, ८ हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक ( एमएच १९ एबी २७७५) दि. १५ रोजी येथील निंभोरा शिवारातील बलवाडी, काशिनाथ चौधरी यांच्या शेता जवळून अनोळखी भामट्याने चोरून नेली. याबाबत पटेल यांनी निंभोरा पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास राजेंद्र पाटील करीत आहे.
राजेश पावरा ( वय २३ रा. सांगवी ता. शिरपूर ) यांच्या मालकीची हिरो कंपनीची, १५ हजार रु. किमतीची दुचाकी क्रमांक ( एमएच १८ एवी ०२६५) दि. ६ रोजी चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या गेट समोरून अनोळखी भामट्याने चोरून नेली. याबाबत पावरा यांनी चोपडा पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास सुभाष सपकाळ करीत आहे.
दिलीपसिंग जोहरी (वय ३९ रा. विठ्ठल मंदिर जहरी वाडा भुसावळ ) यांच्या मालकीची ७० हजार रु. किमतीची ऑटो रिक्षा क्रमांक ( एमएच१९ वी ९२०१) दि. १५ रोजी जोहरी यांच्या घरा जवळून अनोळखी भामट्याने चोरून नेली. याबाबत जोहरी यांनी बाजारपेठ पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास निलेश चौधरी करीत आहे.