⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

‘त्या’ धोरणांच्या विरोधात मुक्ताईनगरात एकदिवशीय श्रृंखलाबद्ध आमरण उपोषण

muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । संविधानविरोधी धोरणांच्या विरोधात मुक्ताईनगर तहसील कार्यालयात भारत मुक्ती मोर्चाचे एकदिवसीय श्रृंखलाबद्ध आमरण उपोषण करण्यात आले. यावेळी भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नितिन गाढे यांच्यसह तालुकाध्यक्ष अरुण जाधव हे उपस्थित होते.


सविस्तर असे की, RSS च्या हेडक्वार्टरवर भारत मुक्ती मोर्चाद्वारे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात तीन लाख लोकांच्या उपस्थितीत प्रोटेस्ट मार्च सफल झाल्याच्यानंतर ज्या बारा विभिन्न मुद्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले होते, जसे की ओबिसींची जातआधारित जनगणना करणे, बॅलेटपेपरवर मतदान घेणे, देशात होत असलेला संविधानद्रोह थांबविणे, एलपीजी, सेजचे कायदे रद्द करणे, बौद्ध विरासतीवरचा कब्जि हटविणे, बिल्कीस बानोला न्याय देणे व इतर मुद्दे आमचे न सुटल्यामुळे चार चरणातील आंदोलन वामन मेश्राम यांनी घोषित केले होते, त्यापैकी दुसरे चरण आज दि.२५ रोजी संपुर्ण देशभरासहीत मुक्ताईनगर तालुक्यात अरुण जाधव (तालुकाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा) यांचे नेतृत्वात तसेच जिल्हाध्यक्ष नितिन गाढे यांचे उपस्थितीत आज आमरण उपोषण सकाळी १० वाजेपासुन सायं ५ वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात आले.

प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हा समन्वयक प्रमोद पोहेकर, लहुजी क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेश ढगे, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष ईरफान बागवान यांनी या आंदोलनाला पाठींबा दिला. देवलाल तांबे (एनएनटीएम तालुकाध्यक्ष), रमेश इंगळे, जाकीर शेख, निलेश वानखेडे, पुनाजी इंगळे, वसंत वानखेडे, वे.डर प्रमोदजी भालेराव, वेंडर किशोर मेढे, भाऊराव निंबाळकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी सायं ५ वाजेला पोलिस अधिकारी संतोष चौधरी यांनी उपवासी क्रांतिकारी कार्यकर्त्यांना ज्युस पाजुन उपोषण आंदोलनाचा समारोप केला.