बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडित मुलगी गर्भवती

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२३ । मुलींना लग्नाचे आमिष देऊन अत्याचार होत असल्याचे प्रकार वाढतच चालले आहे. अशाच एक प्रकार जळगाव जिल्ह्यातील चोपड्यातुन समोर आला आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिडको येथे एकावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हा गुन्हा चोपडा शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

नेमका काय आहे प्रकार?
चोपडा तालुक्यातील एका गावात १६ वर्षे अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ती चोपडा शहरातील एका महाविद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत आहे. दरम्यान तिची एका तरुणाशी ओळख झाली. यांनतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर तरुणाने पीडित मुलीला लग्नाच्या आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला.

मार्च ते सप्टेंबर २०२३ दरम्यान तिच्यावर अत्याचार सुरू होता. त्याच्या नंतर पिडीत मुलगी ही छत्रपती संभाजी नगरात नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेली. दरम्यान या अत्याचारातून पीडित मुलगी ही गर्भवती राहिली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी छत्रपती संभाजी नगरातील सिडको पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यनंतर हा गुन्हा चोपडा शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप संशयित आरोपीला अटक करण्यात आलेले नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहे