खान्देशातील तरुणाच्या संघर्षकथेवर येतोय मराठी चित्रपट; मराठी पाऊल पडते पुढे…

एप्रिल 25, 2023 4:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | २५ एप्रिल २०२३ | खान्देशातील तरुण नोकरीसाठी मुंबईत नोकरीसाठी मुंबईत जातो, तेंव्हा त्याची अमराठी माणसांकडून कशी पिळवणूक होते. तो सरकारी नोकरीवर तुळशीपत्र ठेवून व्यवसायात उतरतो, त्यात त्याला अमराठी व्यावसायिकाविरुद्ध संघर्ष करावा लागतो. या संघर्षातून तो कसा यशस्वी होता? या संघर्षकथेवर एक मराठी चित्रपट येत आहे. ‘मराठी पाऊल पडते पुढे..’ हे चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटात क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे पुत्र चिराग पाटील हे मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आहेत, तर सिद्धी पाटणे अभिनेत्री आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील मुळ रहिवाशी असलेल्या प्रकाश बाविस्कर हे चित्रपटाचे निर्माते आहेत.

marathi paul jpg webp webp

असे आहे चित्रपटाचे कथानक…

Advertisements

शिव हा खान्देशात राहणारा शेतकरी कुटुंबातील तरुण मुंबईत नोकरीसाठी जातो. त्याला सरकारी नोकरी मिळते. मात्र तेथे त्याला दिसते अमराठी माणूस मराठी माणसांची पिळवणूक करतात. यात त्यालाही त्रास सहन करावा लागतो. मग शिव सरकारी नोकरीवर तुळशीपत्र ठेवून व्यवसायात उतरतो, यात त्याला अमराठी व्यावसायिकाविरुद्ध संघर्ष करावा लागतो. या संघर्षातून तो यशस्वी होता का? हेच या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. खान्देशतही या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले असून, अहिराणी गाणे चित्रपटात आहे. ‘मराठी पाऊल पडते पुढे..’ ५ मे २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात झळकणार आहे.

Advertisements

चित्रपटात क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे पुत्र चिराग पाटील हे मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत आहेत, तर सिद्धी पाटणे अभिनेत्री आहेत. अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागरे, संजय कुळकर्णी, प्रदीप कोथमिरे यांच्या भूमिका आहेत. लेखक दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांनी या चित्रपटाची कथा लिहिलेली आहे. पार्श्वसंगीत समीर खोले यांचे आहे. या चित्रपटातून येणारा निव्वळ नफा हा मराठी तरुणांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलासाठी, वृद्धाश्रमासाठी देण्यात येणार असल्याची माहिती निर्माता प्रकाश बाविस्कर यांनी दिली. निर्माता प्रकाश बाविस्कर हे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील रहिवासी आहेत.

डॉ. युवराज परदेशी

पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now