महिलेच्या पोटातून काढला चक्क एक किलो मांसाचा गोळा

जानेवारी 23, 2026 8:24 PM

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ञांकडून यशस्वी शस्त्रक्रिया

dr ulhas patil hospital

जळगाव लाईव्ह न्यूज । नांदुरा तालुक्यातील एका ४३ वर्षीय महिलेच्या पोटातून चक्क एक किलो मांसाचा गोळा काढण्यात डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ञांना यश आले आहे. हा मांसाचा गोळा काढण्यात आल्याने सदर महिलेचे प्राण वाचले.

Advertisements

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदुरा तालुक्यातील ४३ वर्षीय महिलेच्या पोटात सतत दुखत होते. तसेच या महिलेची मासिक पाळी देखिल अनियमीत होऊन तीला त्रास होत होता. अंगावरून देखिल जात असल्याने महिलेला स्थानिक रूग्णालयात दाखविले असता त्यांनी रूग्णाला डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. हुसेना बी यांच्या कुटुंबियांनी तत्काळ त्यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयात उपचारासाठी भरती केले. याठिकाणी महिलेची स्त्रीरोग विभागातील डॉ. प्रिया राठोड, डॉ. वैभव पाटील यांनी तपासणी केली.

Advertisements

तसेच महिला रूग्णाच्या विविध तपासण्या केल्या असता तिच्या पोटात मांसाचा गोळा असल्याचे निदान करण्यात आले. यावेळी महिलेवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. मृदुला मुंगसे, डॉ. ऐश्वर्या चलवदे, डॉ. रश्मी संघवी, डॉ. पल्लवी यांच्या टीमने शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून एक किलोचा मांसाचा गोळा काढला.

ठरावीक वयोमानानंतर शारिरीक बदल होतात. बर्‍याचदा मासिक पाळीतील अनियमीतता, सततची पोटदुखी याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे परिणाम गंभीर होतात. योग्य निदान आणि उपचाराची दिशा मिळाल्यास रूग्णाचा जीव वाचविला जाऊ शकतो.

  • डॉ. ऐश्वर्या चलवदे, निवासी डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now