⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

भयंकर! आठ दिवसाच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू टाकून केली हत्या, निर्दयी बापाला अटक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ सप्टेंबर २०२३ । जामनेर तालुक्यातील हरिनगर तांडा येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. तिसरीही मुलगी झाली म्हणून बापानेच आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखूचा गोळा टाळून हत्या केली. एवढेच नाही मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. आशा वर्करमुळे ही घटना उघडकीस आली असून याप्रकरणी निर्दयी बापाला पोलिसांनी अटक केली.

नेमकी घटना काय?
आरोग्य विभागच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, वाकोदजवळ हरिनगर तांडा (ता. जामनेर) येथील रहिवासी गोकुळ गोटीराम जाधव (३०) याला दोन मुली आहेत. दि. २ सप्टेंबर रोजी वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसरे अपत्य मुलगी जन्माला आली. रविवार, १० रोजी चिमुरडीची गोकुळने हत्या केली.

आशा सेविका या नवजात अर्भकांच्या जन्माची नोंद घेण्यासाठी गोकुळच्या घरी गेल्या, त्यावेळी चिमुरडी तिथे नव्हती. आशा सेविकेने ही माहिती वरिष्ठांना कळवली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी मंगळवारी गावात पोहाेचले. त्यांना सुरुवातीला चिमुरडीच्या आजारपणाने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. डॉ. कुमावत यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्याने चिमुरडीला मारल्याची कबुली दिली.

गोकुळने रविवारी चिमुरडीच्या तोंडात तंबाखू दिली. तिला झोळीत झोपविले. यात तिचा मृत्यू झाला. रात्री चिमुरडीचा मृतदेह फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे आरोग्य पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. रात्री उशिरापर्यंत गोकुळ जाधवविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी सांगितले.