जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२३ । पाचोरा तालुक्यात आ. किशोर पाटील यांनी ठाकरे गटाला धक्का दिला आहे. तालुक्यातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकार्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
चाळीसगाव ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख प्रतिभा पवार, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिता शिंदे, तालुकाप्रमुख मनिषा महाराज, शहरप्रमुख सुवर्णा राजपूत,शिवसेना उपतालुकाप्रमुख संजय पाटील,सोनाली बोराडे,आशा पाटील यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पाचोरा तालुक्याचे आमदार किशोरआप्पा पाटील , रावसाहेब पाटील,शिवसेनेचे नेते उमेश (पप्पुदादा) गुंजाळ, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राहुल पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
आमदार किशोर पाटील यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पाचोर्याचे माजी नगराध्यक्ष संजय गोहिल,बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,शहरप्रमुख किशोर बारवकर, सागर चौधरी,शुभम राठोड आदी पदाधिकारी आणि सहकारी उपस्थित होते. या पक्ष प्रवेशामुळे ठाकरे गटाला धक्का बसला असून शिवसेनेत इनकमींग झाले आहे.