---Advertisement---
जळगाव जिल्हा

कांचन नगरातील नुकसानग्रस्तांना मदतीचा हात; ‘या’ संस्थेच्या वतीने ११ हजारांची मदत

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| २६ ऑगस्ट २०२३। शहरात कांचन नगर भागात भैय्याची वखार येथे एका ठिकाणी गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे घराला मोठी आग लागली होती. लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या आगीत संसारोपयोगी वस्तूसह सर्व वस्तू जळून खाक झाले होते. त्यामुळे, नुकसानग्रस्तांना मदतीचा हात म्हणून आदिवासी कोळी समाजा बहुउ्देशीय संस्थेच्या वतीने ११ हजारांची मदत करण्यात आली.

image 92 jpg webp webp

जळगाव शहरातील कांचन नगर भागातील भैय्या ची वखार जवळील झोपडपट्टीत २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता गँस घळतीमुळे सूभाष भाऊलाल बाविस्कर यांच्या घराला आग लागली होती त्या आगीत सुभाष बाविस्कर यांचे खुप मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचा विचार करून “एक मदतीचा हात” म्हणून सुभाष बाविस्कर व महिला परिवार जणांना ११ हजार रुपये रोख रक्कम स्वरूपात “आदिवासी कोळी समाज बहूउदे्शीय संस्था” जळगाव यांच्या तर्फे देण्यात आली.

---Advertisement---

त्याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा भारत भाऊ सपकाळे, समाज सेवक भिकन नन्नवरे, भरत महाराज सपकाळे, रोहन सोनवणे, अनिल कोळी, रवि पाटील, गोकुळ सूर्यवंशी, जितू सोनवणे, अक्षय सोनवणे, रवि कोळी, नारायण सपकाळे, मनोज सपकाळे, आनंद सपकाळे,रामचंद्र दादा तायडे, संजय बाविस्कर, रमाकांत सोनवणे, भगवान जैतकर ,समाधान नन्नवरे, शिवाजी सूर्यवंशी, आप्पा नन्नवरे, यावेळी मोठ्या संख्येने कोळी समाज बांधव उपस्थित होते

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---