जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या संशयित आरोपीच्या जिल्हापेठ पोलीसांनी मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून एकूण १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या. राकेश पंडीत भाट (वय-२४) रा. मोठे वाघोदे ता. रावेर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे
जळगाव शहरासह जिल्ह्यामधील विविध भागातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून याच अनुषंगाने जिल्हा पेालीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली.
दरम्यान, सीसीटीव्ही आणि जनरल फुटेजच्या आधारे संशयित आरोपी हा जळगाव शहरातील संशयित आरोपी अजिंठा चौकात असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी गुरूवारी ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचून संशयित आरोपी राकेश भाट याला अटक केली. त्यांच्या कसून चौकशी केली असता त्याने सात ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. या दुचाक्यांची एकूण मूल्य १ लाख ८० हजार रुपये इतके आहे. ही कारवाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोहेकॉ सलीम तडवी, पोलीस नाईक जुबेर तडवी, पोकॉ अमितकुमार मराठे, पोकॉ रविंद्र साबळे आणि तुषार पाटील यांनी ही करवाई केली.
दरम्यान, संशयित आरोपी राकेश भाट याच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ४, भुसावळ शहरात १, एमआयडीसी पोलीस ठाण्यात २ असे एकुण ७ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.