ट्रॅक्टरची धडक बसल्याने शेतकरी ठार ; भुसावळ तालुक्यातील घटना

ऑक्टोबर 26, 2023 5:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२३ । शेतात जाणाऱ्याला ट्रॅक्टरची धडक बसल्याने एकाच मृत्यू झाल्याची घटना भुसावळ तालुक्यातील कठोरा खुर्द येथे घडली. गंगाराम भास्कर पाटील (५८) असं मृत शेतकऱ्याच नाव असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

gangaram patil jpg webp

याबाबत असं कि, भुसावळ तालुक्यातील कठोरा येथील गंगाराम भास्कर पाटील हे शेतात जात असताना प्रल्हाद सिताराम पाटील यांच्या घरा समोर पाठीमागुन येणाऱ्या एम एच १९ ई ए ४०३० या ट्रॅक्टर ने पाठीमागुन जोरदार धडक दिल्याने त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासणी करून मृत घोषीत केले

Advertisements

या बाबत वरणगाव वरणगाव पोलीस स्टेशनला संजय भास्कर पाटील यांच्या खबरी वरून ट्रॅक्टर ड्रॉयव्हर संकेत अनिल पाटील त्याच्या विरोधात भादवी कलम ३०४ अ , २७९, ३३७ , ३३८ , १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास पोहेकॉ मनोहर पाटील हे करीत आहे

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now