जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरीचे आमिष देऊन अनेकांना गंडविले जात असल्याचे प्रकार वाढताना दिसत असून अशीच एक प्रकार समोर आला आहे. रेल्वे पोलिस दलात नोकरीचे आमिष दाखवून जळगाव येथील शेतकऱ्याला सुमारे ११ लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील शेतकरी नामदेव भावडू पाटील (वय ५९) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार देवपुरातील चंद्रभान जवरीलाल ओसवाल सवाल व प्रसाद रोहिदास हरताली (रा. मुंबई) यांनी पाटील यांच्या मुलाला रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. दोघांवर विश्वास ठेऊन पाटील यांनी ओसवाल व हरताली यांना लाख रुपये दिले. मोहन ७ भावसारच्या घरी हा व्यवहार झाला. त्यानंतर या दोघांनी पुन्हा मागणी केल्यामुळे त्यांना ऑनलाइन दोन लाख रुपये पाठवले. परंतु यानंतर मुलाला नोकरीला लावण्यात आले नाही. तसेच पैसे परत मागितल्यावर ते देखील परत केले नाही.
आपली फसवणूक झाल्याचे नामदेव पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नगरदेवळा पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर शून्य क्रमांकाने त्यांची तक्रार दाखल करुन घेत ती देवपूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. त्यावरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक धनंजय पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक पावरा पुढील तपास करत आहे. दरम्यान, नोकरीच्या अमिषाने फसवणुकीच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत