⁠ 

अमळनेरात पुरुष जातीचे मृत अर्भक आढळल्याने खळबळ

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२३ । अमळनेर शहरात दोन दिवसांच्या पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक आढळून आले. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत असे की, अमळनेर ते चोपडा रोडवरील बोरी नदीच्या फरशीपुलाच्या खाली एक अर्भक मयतस्थितीत आढळून आले. अमळनेरचे हवालदार संजय पाटील आणि घनश्याम पवार या पालिसस कर्मचार्‍यांनी धाव घेतली. यावेळी नागरीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. हे अर्भक कुणाचे आहे याबाबात कोणतीही माहिती मिळाली नाही.

याबाबत पोलिसांनी चौकशीला कसुन सुरूवात केली आहे. पंचनामा करून अर्भकाचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. हवालदार संतोष पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहेत.