---Advertisement---
गुन्हे अमळनेर

उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी धडकून दाम्पत्याचा मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२३ । जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच असून याच दरम्यान, उभ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अमळनेर तालुक्यातील गांधली रोडवरील सप्तश्रृंगी मंदिराजवळ असून याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp webp

याबाबत असे की, अमळनेर तालुक्यातील पिळोदा येथील युवराज दयाराम पाटील (वय-६२) आणि त्यांची पत्नी मंगलबाई युवराज पाटील (वय-५५) हे दोघे दुचाकीने पारोळा येथे गेले होते. सोमवारी सायंकाळी घरी दुचाकी (एमएच १९ एके ५२५०) ने परतत असतांना गांधली गावानजीक सप्तश्रृंगी मंदीराजवळ त्यांची दुचाकी उभ्या ट्रक्टर (एमएच १९ सीव्ही १६३२)वर आदळली

---Advertisement---

यात दोघे गंभीररित्या जखमी झाले होते. अपघात घडल्यानंतर रोडवरील वाहनधारकांनी रस्त्यावरच वाहने थांबवून अपघात ग्रस्तांना बचाव कार्याला मदत केली. जखमी मंगलबाई यांना तातडीने खासगी वाहनातून अमळनेर येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या उपचार करण्यापुर्वीच त्यांची प्राणज्योत मालविली होती.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे.

या घटनेप्रकरणी अक्षय किशोर पाटील (वय-२७) रा. पिळोदा ता.अमळनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकाविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा पिंगळे हे करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---