⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

वनरक्षकास शिवीगाळ व शासकिय कामात अढथळा आणणाऱ्यावर गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | 15 मार्च 2024 | वनपरिक्षेत्र देवझिरी कार्यालय येथे कांतीलाल गुलाब पावरा रा. खैर कुंडीपाडा ह्याने वनरक्षक विजय पावरा व वनसेवक रवींद्र बारेला, संजय बारेला यांना शिवीगाळ करून तुमचे मुंडके उडवून देईल अशी धमकी दिल्याने शासकीय कामात अडथळा निर्माण करत तसेच शिवीगाळ व धक्काबुक्की आणि जिवेमारण्याची धमकी दिल्याने कांतीलाल गुलाब पावरा विरुद्ध अडावद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

2024 मधील प्रथम वन अपराधातील गुन्ह्यातील जप्त मुद्देमालातील सागाचे एकुण ४८ नग वनरक्षक विजय मोत्या पावरा यांनी वनपरिक्षेत्र देवझिरी कार्यालय येथे आणून ठेवले असता त्यावेळी कांतीलाल गुलाब पावरा रा. खैर कुंडीपाडा हा वनपरिक्षेत्र देवझिरी कार्यालय येथे युवून व वनरक्षक व वनसेवक यांना जंगलातील तोडलेले सागाचे लाकडे उचलून आणण्यावरून शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. व सागाची वृक्षतोड मीच केली होती व या पुढेही करेल असे बोलून तेथून निघून गेला. त्यानंतर बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील आदीमित्र सर्वेक्षणसाठी आलेले विद्यार्थींना वनरक्षक गुन्ह्याच्या सर्वे कामी शासकीय वाहनात बसून सर्वेक्षणासाठी खैर कुंडीपाडा येथे गेले तेव्हा सदर इसमावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा राग आल्याने शासकीय वाहनावर तसेच कर्मचाऱ्यांवर व विद्यार्थ्यांवर दगड फेक, शिवीगाळ आणि धक्का बुक्की केली. दगड फेकी मुळे शासकीय वाहनाचे नुकसान झाले आहे.

पुढील तपास उपवनसंरक्षक यावल, सहाय्यक वनसंरक्षक चोपडा व देवझिरी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्गदर्शाखाली करण्यात आली अशी माहिती सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे, चोपडा यावल वनविभाग, जळगांव यांनी दिली आहे