माझ्यासोबत प्रेम संबध ठेव, नाहीतर… ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

ऑक्टोबर 10, 2023 4:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२३ । मी तुझ्यावर प्रेम करतो..लग्न देखील करायचे माझ्यासोबत प्रेम संबध ठेव नाहीतर तुझ्या आजीला ऍसिड टाकून मारून टाकेल अशी धमकी अल्पवयीन मुलीला दिल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

crime 12 jpg webp

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आजीसोबत वास्तव्यास असून गेल्या आठ महिन्यापासून अल्पवयीन मुलगी शाळेत जाता येताना व गावात काही कामानिमित्त बाहेर आली असता, तिच्याजवळ जावून मी तुझ्यावर प्रेम करतो मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे.

Advertisements

माझ्यासोबत प्रेम संबध ठेव पण अल्पवयीन मुलीने त्याला नेहमी नकार दिल्याने याच राग मनात ठेवून तिला शिवीगाळ व आजीला ॲसिड टाकून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दि.९ रोजी एका विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now