⁠ 
सोमवार, मार्च 4, 2024

माझ्याशी संबंध वाढव नाहीतर.. तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज : 10 डिसेंबर 2023 : तरुणीशी जवळीक साधत तिच्याशी जबरदस्तीने अश्लील चाळे करने तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. याबाबत तरुणीच्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अक्षय जयस्वाल या तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच माझ्याशी संबंध वाढव नाहीतर तुझ्या वडिलांना खोट्या गुन्ह्यात अडकवेल व तुझ्या भावंडांना सुद्धा मारुन टाकेल, असंही फिर्यादित म्हटलं आहे.

याबाबत अधिक असे की, जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक तरुणी शिक्षण घेत आहे. जून २०२२ मध्ये अक्षय अजय जयस्वाल (२३, रा. शिवाजीनगर, जळगाव ) या तरुणाने तिच्याशी जवळीक साधण्याच्या उद्देशाने ओळख केली. त्यानंतर तिला मेहरुण तलाव येथे घेऊन जाऊन तिच्याशी जबरदस्तीने अश्लील चाळे केले. तसेच तरुणीचा सतत पाठलाग करीत असे. तरुणीने त्याच्याशी संबंध वाढविले नाही व घरी सांगितले तर तिच्या वडिलांना खोट्या गुन्ह्यात अडकवून आणि टोळी पाठवून भावांना मारुन टाकेल, अशी धमकी दिली.

या प्रकरणी तरुणीने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अक्षय जयस्वाल या तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि मीरा देशमुख करत आहेत.