⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | गुन्हे | लाभार्थ्यांच्या रेशनधान्याची परस्पर विल्हेवाट ; रेशनदुकानदार महिलेवर गुन्हा दाखल

लाभार्थ्यांच्या रेशनधान्याची परस्पर विल्हेवाट ; रेशनदुकानदार महिलेवर गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२४ । लाभार्थ्यांना मिळणाऱ्या रेशनधान्याची परस्पर विल्हेवाट लावून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पुरवठा निरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर तालुक्यातील लोण खुर्द येथील रेशनदुकानदार महिलेवर मारवड पोलीसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील लोण खुर्द गावात रेशन दुकान क्रमांक ७२ हे रमनबाई प्रल्हाद पाटील ह्या चालवतात. शासनाच्या वतीने जुलै २०२४ मध्ये दिलेला रेशनधान्याचा कोटा हा जुन २०२४ मध्ये देण्यात आला होता. दरम्यान, रेशनदुकानदार रमनबाई पाटील यांनी जुलै महिन्यातील धान्याचा कोटा हा जून महिन्यात वाटून ते लाभार्थ्यांना जुलै महिन्याचे धान्य दिल्याचे भासवले.

त्यानंतर रेशन धान्याची परस्पर विल्हेवाट लावून शासनाची आणि लाभार्थ्यांची फसवणूक केली आहे. दरम्यान हा प्रकार १ जून ते २० ऑगस्ट दरम्यान घडला आहे. हा प्रकार अमळनेर येथील पुरवठा निरीक्षक निंबा जाधव यांच्या लक्षात आला. त्यानुसार त्यांनी मारवड पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार मारवड पोलीसात रेशनदुकानदार रमनबाई प्रल्हाद पाटील रा. लोण खुर्द ता.अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.