⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | विनापरवाना बैलगाडी शर्यत बोवली ; जळगावात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल

विनापरवाना बैलगाडी शर्यत बोवली ; जळगावात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२४ । जिल्ह्यात बैलगाडी शर्यती आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र परवानगी न घेता मेहरुण गावात १६ रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रकरणी सोमवारी चार जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही ठिकाणी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यासाठी १५ दिवस अगोदर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र तसे न करता मेहरुण गाव शिवारात १६ फेब्रुवारी रोजी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. हा प्रकार लक्षात आल्याने जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे अधिकारी गणेश भांडारकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यावरून आयोजक वैभव युवराज सानप, विवेक वासुदेव सानप, प्रणव हरिचंद्र गवळी, संकेत सोपान महाजन यांच्याविरुद्ध दि. १९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.