लग्नाचे आमिष दाखवून ठेवले शारिरीक संबंध, तरुणीची तरुणाविरुद्ध तक्रार दाखल

मे 12, 2023 12:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२३ । मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसत असून अशातच एरंडोलमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. लग्नाचे आमिष दाखवून फार्म हाऊसवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आलीय. ३५ वर्षीय पिडीत तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून एरंडोल पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

crime 1 jpg webp

नेमकी काय आहे घटना?
पिडीत तरुणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अंकुश महाजन याने आपल्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून सन 2020 पासून आतापर्यंत वेळोवेळी एरंडोल-जळगाव महामार्गावरील एका फार्म हाऊसवर नेत शरीर संबंध प्रस्थापित केले.

Advertisements

याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला बलात्कारासह अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उप विभागीय अधिकारी राकेश जाधव करत आहेत.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now