⁠ 
गुरूवार, मे 23, 2024

जामनेरमधील 15 वर्षीय मुलीला फूस लावून वळविले ; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२३ । अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशातच आता जामनेर शहरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले नेल्याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील स्वामी रेडियम दुकानाजवळ १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही मैत्रीणीसोबत शुक्रवारी २७ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता लस्सी पिण्यासाठी दुकानावर आल्या होत्या. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला काहीतरी कारण सांगून फूस लावून अपहरण केले. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा जामनेर शहरातील बाजारात शोध घेतला.

परंतू कुठेही काहीही माहिती मिळाली नाही. अखेर नातेवाईकांनी जामनेर पोलीस ठाण्यात सायंकाळी ७ वाजता धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल वाटे करीत आहे.