गुन्हेजळगाव जिल्हा

पुलाच्या कठड्याला धडक देत कार पलटी; पती जागीच ठार, पत्नी, मुलगा गंभीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२३ । अमळनेर- धुळे महामार्गावरील जानवे गावाजवळ असलेल्या पुलाच्या कठड्याला भरधाव चारचाकी धडकल्याने कार पलटी झाली. यात कार चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. भगवान दलपत सपकाळे (वय ६३, रा. गिरणा पंपिंगजवळ, जळगाव) असं मृताचे नाव असून या अपघातात सोबत असलेली पत्नी व मुलगी गंभीर जखमी आहेत.

अमळनेर- धुळे महामार्गावर झालेल्या अपघातात भगवान दलपत सपकाळे हे पत्नी विजया कोळी (वय ५५) आणि मुलगी कुंतला कोळी (वय २४) यांना घेऊन कारने अमळनेरहून धुळ्याकडे जात होते. या दरम्यान जानवे गावाजवळ असलेल्या पुलाच्या कठड्याला भरधाव चारचाकी धडकल्याने कार पलटी होऊन भगवान सपकाळे जागीच मृत्यू झाला. विजया आणि कुंतला कोळी दोन्ही जखमी झाले.

अपघात (Accident) होताच परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेने त्यांना उपचारासाठी धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेचे वृत्त कळताच सहायक निरीक्षक हरिदास बोचरे व पोलिस कर्मचारी कैलास शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिस पाटील विलास पाटील यांच्या फिर्यादीवरून मृत भगवान सपकाळे यांच्याविरुद्ध स्वतःच्या मृत्यूस व दोघांना जखमी करण्यास कारणीभूत ठरले म्हणून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील तपास करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button