⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जामनेर | जामनेर : 30 हून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली

जामनेर : 30 हून अधिक विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस उलटली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२३ । जामनेर तालुक्यात 30 हून अधिक विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या स्कुल बसचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. बसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने स्कूल बस अनियंत्रित होऊन रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात 30 हून अधिक विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पहुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले

नेमकी काय आहे घटना?

शेंदुर्णी येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेची बस ही सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघाली होती. याचवेळी पहुर-शेंदुर्णी दरम्यान बसचे स्टेअरिंग रॉड तुटल्याने बस रस्त्यावर पलटली. शाळेपासून पाच किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. यावेळी बसमध्ये 30 हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक प्रवास करत होते. बस पलटल्याने सर्व जण जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुखापत झाली नाही.

अपघात घडताच स्थानिक रहिवासी तात्काळ धावत आले. स्थानिकांनी बसमधील विद्यार्थी, शिक्षकांना बाहेर काढून खाजगी वाहनातून रुग्णालयात नेले. पहूर पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पहूर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.