⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

आ.भोळे तुमचा अतिक्रमण करणाऱ्यांना व ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा खटाटोप कशापई?

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ फेब्रुवारी २०२३ । आ.राजुमामा भोळे तुमचा अतिक्रमण करणाऱ्या धनदांडग्यांना व ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा खटाटोप नेमका कशापई सुरु आहे? जळगावकरांना रस्ते हवे म्हणुन निकृष्ट दर्जाचे रस्ते कशाकरता माथी मारताय? टैक्सपेयरचा पैसा ठेकेदारांच्या पदरात टाकण्याकरता आपली सुरु असलेली धडपड जळगावकरांना पण कळते.

मामा तुम्ही गेले 8 वर्षांपासुन आमदार आहात त्यासोबतच काही वर्ष आपल्या पत्नी जळगाव शहराच्या महापौर असतांना आपल्याला रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत काहीच बोलावस वाटल नाही, हे नवलच नाही का? असा सवाल राष्ट्र्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी प्रसिद्धी पत्रकातून विचारला आहे.

बर आता रस्ते होत असतांना आमदार म्हणुन तरी तुम्ही इच्छादेवी ते डीमार्ट रस्त्याचे काम कशा पध्दतीने होत आहे हे पाहण्याचे कष्ट आपण घेतले का? आपण पहाणी व मोजमाप केले असते तर तर तुम्हाला सत्यतेची जाणीव झाली असती., पण तुम्ही डोळे बंद करुन निकृष्ट दर्जाचे काम जळगावकरांच्या माथी मारत असाल तर यात आपल्याला काही लाभ तर होत नाहीये ना!! अशी शंका नक्कीच जळगावकरांच्या मनी आल्याशिवाय राहणार नाही. असेही राष्ट्र्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी म्हणाले

पुढे बोलताना त्यांनी प्रसिद्धी पत्रकात लिहिले आहे कि, आमदार खडसेंनी पहाणी करतांना सर्वांसमोर रस्त्याचे मोजमाप करुन दाखवल व वर्क ऑर्डर नुसार 10 मीटर चा रस्ता मंजुर असुन त्या अनुषंगानेच ठेकेदाराला पैसे मिळणार आहे मग अतिक्रमण न काढता 7.5 ते 8 मीटर चा रस्ता तयार होत असेल व तेही निकृष्ट दर्जाचे असतील काम थांबवण्याची मागणी योग्यच आहे ना… राजुमामा तुम्ही मंजुर 10 मीटर पैकी 2 ते 2.5 मीटर रस्ता ठेकेदाराच्या घशात घालु इच्छित असाल तर त्यात कीती मिटरचा हिस्सा आपल्याला मिळणार याची तरी माहीती जळगावकरांना द्यावी म्हणजे तुम्ही कसे जळगावकरांच्या भावनांशी खेळताय हे देखील कळेल

आमदार आणि महापौर पद तुमच्याकडेच असतांना रस्त्यांची दुरवस्था झालेली असतांना तुम्हाला जळगावकरांच्या भावना नाही आठवल्या हो. मामा आता तरी जळगावकरांना मामा बनवण थांबवुन ठेकेदारांना पाठीशी घालण सोडा आणि शहरात इतर ठिकाणी बोगस व निकृष्ठ प्रकारचे रस्ते चे बोगस कामे होत आहे त्याबद्द कधी आवाज काढला का ? शहरातील ज्या रस्ते चे बोगस कामे होत आहे ते ठेकेदार कोणत्या पक्षाचा आहे जळगावकरांच्या हिताचा विचार करा असे अशोक लाडवंजारी म्हणाले.