⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

खडके येथील ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव लाईव्ह न्यूज| ९ ऑगस्ट २०२३। अमळनेर तालुक्यातील खडके येथे एका ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आठ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आला .

याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्रकाश ओंकार पाटील वय ७० रा. खडके ता. अमळनेर यांनी ८ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेतला.

कुटुंबियांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पाटील यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत वैद्यकीय अधिकारी दिलेल्या खबरीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहायक फौजदार संजय पाटील करीत आहे.