जळगाव लाईव्ह न्यूज । १९ जून २०२४ । यावल तालुक्यातील वड्डी येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथील २३ वर्षीय तरुणीला किरकोळ कारणावरून गावातीलच ८ जणांनी शिवीगाळ व काठीने मारहाण केली. तिला ठार मारण्याची धमकी दिली. यात तरुणीला दुखापत झाली आहे.
या घटनेप्रकरणी यावल पोलिसांत ८ जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. वडी येथील रहिवासी मीना परवेझ तडवी ही तरुणी आपल्या घराबाहेर बसली होती. तेथे आलेले जुबेदाबाई राजू तडवी, मेगाबाई कलिंदर तडवी, मीनाबाई बिन्हाम तडवी, रेहान इरफान तडवी, बिहाम कलिंदर तडवी, इरफान राजू तडवी, कलिंदर सिकंदर तडवी व राजू सिकंदर तहवी (सर्व रा.वडी) यांनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ व मारहाण केली.
काठीने तरुणीला मारहाण केल्याने ती जखमी झाली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तिच्या फिर्यादीवरून दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला. तपास हवालदार राजेंद्र पवार करत आहे.