⁠ 
सोमवार, मे 20, 2024

विजेच्या ताराचा शॉक लागल्याने १६ वर्षीय तरुण ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२३ । घराची साफसाफाई करत असताना विजेच्या तारावर पाय पडल्याने १६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव शहरातीलगणेश कॉलनीत घडली. सुनील संजय चव्हाण (१६, मूळ रा. मन्यारखेडा) असं मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे चव्हाण कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांनी आक्रोश केला.

सुनाल चव्हाण हा जळगावातील बोहरा गल्लीतील बांधकामाच्या ठिकाणी आई-वडील व बहिण यांच्यासोबत वास्तव्याला आहे. बोहरा गल्लीतील फटाके दुकान मालकाने त्यांच्या गणेश कॉलनीतील घरी साफसफाई करण्यासाठी सुनील चव्हाण आणि त्याचा मित्र सागर सुभाष शिंदे यांना बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सकाळी पाठविले होते.

दोघेजण घराची साफसफाई करत असताना सुनीलच्या पायाचा वीज तारेला स्पर्श झाला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.