जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ । एरंडोल येथील दादासाहेब दि. शं. पाटील महाविद्यालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या covid-19 लसीकरण केंद्राला आमदार चिमणराव पाटील यांनी भेट देऊन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती जाणून घेऊन विविध प्रकारच्या सूचना केल्या.
आमदार चिमणराव पाटील दिनांक २८ मे रोजी एरंडोल येथे आले असता दादासाहेब पाटील महाविद्यालय या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या covid-19 लसीकरण केंद्र ला त्यांनी भेट देऊन कोविड बाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. व त्यांना लसीकरणाबाबत रुग्णां बाबत विविध प्रकारच्या सूचना केल्या पूर्वी कोविड सेंटर हे ग्रामीण रुग्णालयात होते नागरिकांना फार लांब जावे लागत असल्याने कधीकधी खाली हात परतावे लागत होते जनतेच्या अडचणी लक्षात घेता सदरचे कोविड सेंटर म्हसावद नाक्यावरील दि. शं पाटील महाविद्यालय सुरू केल्याने आमदार पाटील यांनी समाधान व्यक्त केले.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील डॉ. मुकेश चौधरी यांच्याशी त्यांनी माहिती जाणून घेतली. याप्रसंगी जि प चे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश महाजन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते आनंदा चौधरी, भगत माजी नगरसेवक सुनील चौधरी, नितीन बिरला, नगरसेवक व शहर प्रमुख कुणाल महाजन अतुल महाजन, परेश बिर्ल, पंचायत समिती उपसभापती अनिल महाजन चिंतामण पाटील, राजेंद्र महाजन, राजेंद्र ठाकूर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.