प्रवाशांसाठी खुशखबर ! रेल्वे प्रशासनाने ‘या’ विशेष गाड्यांची मुदत वाढविली
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२१ । प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने गाडी संख्या सुधारित संरचना व विशेष शुल्कासह उन्हाळी विशेष गाड्यांची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुदत वाढविण्यात आलेल्या गाड्यांमध्ये –
पुणे-गोरखपूर विशेष- ०१३२९ पुणे- गोरखपूर विशेषच्या सेवा दि.१, ३, ५, ८, १०, १२ व १५ जूनपर्यंत ०१३३० गोरखपूर – पुणे विशेष सेवा दि.३, ५, ७, १०, १२, १४ व १७ जूनपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.
पुणे-दानापूर विशेष-०१३३१ पुणे-दानापूर विशेष सेवा दि. ४, ७, ११ व १४ जूनपर्यंत आणि ०१३३२ दानापूर-पुणे विशेष अतिजलद सेवा दि.५, ८, १२ व १५ जूनपर्यंत.
पुणे-दरभंगा विशेष- ०१३३३ पुणे-दरभंगा विशेषच्या सेवा दि. ३ व १० जूनपर्यंत. ०१३३४ दरभंगा-पुणे विशेषच्या सेवा दि. ५ व १२ जूनपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.
०१३३५ पुणे-भागलपूर विशेषच्या सेवा दि. ६ व १३ जूनपर्यंत, तर ०१३३६ भागलपूर-पुणे विशेष ८ व १५ जूनपर्यंत.
०१३५९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-गोरखपूर विशेषच्या सेवा दि.२, ४, ६, ७, ९, ११, १३ व १४ जूनपर्यंत. ०१३६० गोरखपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेषच्या सेवा दि. ४, ६, ८, ९, ११, १३, १५ व १६ जूनपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.
०१३६१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-दानापूर विशेष अतिजलदच्या सेवा दि. ३ व १० जून रोजीपर्यंत, तर ०१३६२ दानापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष अतिजलदच्या सेवा दि. ४ व ११ जूनपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.
०१३६३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-दरभंगा विशेषच्या सेवा दि.१, ८ व १५ जूनपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. ०१३६४ दरभंगा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष दि. ३, १० व १७ जूनपर्यंत.
०१३६५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-छपरा विशेष दि. ५ व १२ जूनपर्यंत. ०१३६६ छपरा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष दि. ७ व १४ जूनपर्यंत.
०१३५५ लोटिट-गोरखपूर विशेषच्या सेवा दि. १, ८ व १५ जूनपर्यंत. ०१३५६ गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेषच्या सेवा दि.३, १० व १७ जूनपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी विस्तारित गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.